नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी तमिळनाडु, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिसा, महाराष्ट्र आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांशी कोविड-19 संबंधी स्थितीवर चर्चा केली. तीन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी पूर्वोत्तरच्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून कोविड-19 च्या स्थितीचा आढावा घेतला होता. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी काही राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने चिंता व्यक्त करत सावध केले की, अशाप्रकारचे आकडे दुसर्या लाटेच्या अगोदर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दिसून आले होते. ज्या राज्यांमध्ये प्रकरणे वाढली आहेत तिथे तिसर्या लाटेची शक्यता रोखण्यासाठी सक्रिय उपाय करावे लागतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पंतप्रधानांनी कोविडला तोंड देण्यासाठी ’टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि टीका (व्हॅक्सीन)’ रणनीतीवर जोर दिला. त्यांनी म्हटले की, जास्त संख्या असलेल्या जिल्ह्यांकडे लक्ष दिले पाहिजे. मागील एक आठवडाभरात सुमारे 80 टक्के नवीन प्रकरणे या सहा राज्यांतून आहेत. महाराष्ट्र आणि केरळातील कोविडच्या प्रकरणातील वाढ देशासाठी चिंतेचा विषय आहे. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, आरोग्यमंत्री सुद्धा उपस्थित होते. PM Narendra Modi | pm holds meeting with chief ministers of 6 states expresses
मुख्यमंत्र्यांनी कोविडला तोंड देण्यासाठी सर्वप्रकारे मदत आणि पाठींबा देण्यासाठी पंतप्रधानांना धन्यवाद दिले.
त्यांना पंतप्रधानांना लसीकरणातील प्रगती आणि त्यांच्या राज्यात व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी उचलण्यात
येत असलेल्या पावलांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी उचलण्यात
आलेल्या पावलांची माहिती दिली आणि भविष्यात प्रकरणांमधील कोणत्याही संभाव्य वाढीला तोंड देण्यासाठी
सूचना केल्या. त्यांनी रूग्णांसमोर येणारे कोविडचे मुद्दे आणि अशा प्रकरणांमध्ये मदत देण्यासाठी उचलण्यात
येत असलेल्या पावलांवर सुद्धा चर्चा केली. त्यांनी आश्वासन दिले की ते संसर्गाची वाढ नियंत्रित करण्याचा पूर्ण
प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले की, सुरुवातीला तज्ज्ञ असे समजत होते की, जिथून दुसर्या लाटेची
सुरूवात झाली होती, तिथे स्थिती अगोदर नियंत्रणात येईल. परंतु महाराष्ट्र आणि केरळात कोरोना प्रकरणांमध्ये
वाढ दिसून येत आहे. हे खरोखरच आपल्या सर्वांसाठी चिंताजनक आहे. खुप आवश्यक आहे की, ज्या
राज्यांमध्ये केसेस वाढत आहेत, त्यांनी सक्रिय उपाय करून तिसर्या लाटेची कोणतीही शक्यता रोखली
पाहिजे.
मोदी म्हणाले, तज्ज्ञ सांगतात की, मोठ्या कालावधीपर्यंत सतत प्रकरणे वाढल्याने कोरोना व्हायरसमध्ये परिवर्तन (म्यूटेशन) ची शक्यता वाढते, नवनवीन व्हेरिएंटचा धोका वाढतो. यासाठी, तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोनाविरूद्ध प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे.
त्यांनी म्हटले, सूक्ष्म नियंत्रण क्षेत्रावर (मायक्रो कंटेन्मेंट झोन) आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागेल. ज्या जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर (पॉझिटिव्हिटी रेट) जास्त आहे, जिथून प्रकरणांची संख्या जास्त येत आहे, तिथे तेवढाच जास्त फोकस केला पाहिजे.
पंतप्रधान म्हणाले, देशातील सर्व राज्यांसाठी नवीन आयसीयू बेड्स बनवणे, टेस्टिंग क्षमता वाढवणे आणि इतर सर्व गरजांसाठी फंड उपलब्ध करून दिला जात आहे. केंद्राने नुकतेच 23 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त एमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेज सुद्धा जारी केले आहे.
Web Title : PM Narendra Modi | pm holds meeting with chief ministers of 6 states expresses
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update