बहुजननामा ऑनलाइन टीम – आपली बहिण आणि आईची अश्लिल चाळे करुन मुलानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर(raped by youth)आला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी २५ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बोपखेलमधील रामनगरमध्ये घडला.
याप्रकरणी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाविरुद्ध फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबरपासून सुरु होता. फिर्यादी या १६ डिसेंबर रोजी रात्री घरात झोपल्या असताना त्यांचा भाऊ शेजारी येऊन झोपला व त्याने त्यांच्याशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. यापूर्वीही त्याने असाच प्रकार आपल्या आईसोबत देखील केला होता. हा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. तेव्हा त्यांनी त्याला जाब विचारल्यावर त्याने आईवडिलांना व त्यांचा दुसर्या भावाला शिवीगाळ करुन फिर्यादी यांना हाताने व लाकडाने मारहाण केली. या प्रकारानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.