पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Crime News | पती पत्नीतील भांडणात घरगुती चर्चा करण्याच्या नावाखाली बोलावून जात पंचायत भरवुन तरुणाला 15 लाख रुपयांचा दंड केला़ दंड न भरल्याने तरुणाला कंजारभाट समाजातून (kanjarbhat community) बहिष्कृत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इचलकंरजी (ichalkaranji) येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad) भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे (Bhosari MIDC Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पंचासह 10 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रशांत ऊर्फ विकी गागडे (रा. आदर्शनगर, मोशी), संगीता गागडे, शुभम गागडे, छोटू गागडे (रा. भाटनगर, पिंपरी), जात पंचायतीचे अध्यक्ष विजय गागडे (रा. येरवडा), पंच गुल्या अबंगे, सूर्यकात माचरे, शशिकांत
गागडे (रा. आदर्शनगर, मोशी), बबलु तामचीकर (रा. पिंपरी) , सुभाष माचरे (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल
केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) कायदा २०१६ मधील जनतेचे
महाराष्ट्र सरंक्षण का. क़ 3, 4, 5, 6 व 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आणि त्याची पत्नी यांच्यात वाद होता. त्यातून त्यांची पत्नी माहेर आली होती. त्यांच्या पत्नीला
नांदायला पाठवावे किंवा नाही, यासंबंधी घरगुती चर्चा करण्यासाठी फिर्यादी यांना १ फेब्रुवारी रोजी मोशी
येथील मार्केटशेजारी (Moshi Market) बोलविले होते. मात्र, फिर्यादी यांना काही एक न सांगता जात
पंचायत भरविली. त्यात फिर्यादी यांना जात पंचायतीने 15 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. व दंड न भरलयास कंजारभाट या जातीतून बहिकृत करण्याची शिक्षा दिली. फिर्यादी यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने
त्यांना कंजारभाट समाजातून (kanjarbhat community) बहिष्कृत केले आहे. या घटनेनंतर आता
फिर्यादी यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिल्यावर पोलिसांनी पंचासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Web Titel :- pimpri crime young kanjarbhat expelled from society for non payment of rs 15 lakh fine imposed by caste panchayat fir on 10 arbitrators
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update