पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. शहरात रुग्ण वाढत असताना बरे होण्याचे (Recover patient) प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच शहरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 1000 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 7868 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1000 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pimpri Corona) संख्या 2 लाख 82 हजार 329 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 398 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 3 हजार 135 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 326 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2809 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 22 हजार 143 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 30 लाख 40 हजार 822 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | Worry! 1000 new patients of Corona in Pimpri Chinchwad, find out other statistics.