पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 146 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 551 रुग्ण बरे झाले आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 126 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 146 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 373 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 551 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 51 हजार 629 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरामध्ये सध्या 1863 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 119 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1744 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरातील 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pimpri Corona Update | 146 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics
Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने केले ‘कंगाल’, सातत्याने लागत आहे लोअर सर्किट