पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. रुग्ण वाढत असल्याने सक्रिय (Active patient) रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 161 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.(Pimpri Corona)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 161 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 59 हजार 154 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 37 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 53 हजार 389 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 472 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.5) शहरामध्ये 24 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 12 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 19439 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 7 लाख 09 हजार 083 जणांना लस देण्यात आली आहे.
web title: Pimpri Corona | Corona discharges 161 new patients, 37 patients in Pimpri Chinchwad.
Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण
12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्यांची खुर्ची मजबूत होणार ? जाणून घ्या