आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 946 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 83 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 906 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 675 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 437 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 218 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 219 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच शहरातील पूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात 4 ओमिक्रॉनचे रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज चार ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहे. चार रुग्णांमध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. चार रुग्णांपैकी 1 रुग्ण थायलंड, 1 जपान, 1 दक्षिण आफ्रिका येथून आले आहेत.तर एक रुग्ण रॅन्डम तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सर्व रुग्णांवर भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दिवसभरात 8,928 जणांचे लसीकरण
आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 8 हजार 928 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 29 लाख 52 हजार 726 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title :- Pimpri Corona | 83 patients diagnosed with Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics
Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट