बहुजननामा ऑनलाईन
अनेकांना भेळ, पाणीपुरी, शेवपुरी अशा पदार्थांची आठवण होत आहे. परंतु कोरोनामुळं अनेकजण हे खाणं टाळत आहे. अशात आता पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांसाठी ऑटोमेटीक मशीनद्वारे हायजेनिक पाणीपुरी उपलब्ध झाली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घेण्यात आलेली सर्वतोपरी खबरदारी पाहता नागरिकांची या पाणीपुरीची चव चाखण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी होताना दिसत आहे.
नामांकित कंपनीत काम करणाऱ्या आणि उच्च शिक्षित अशा 5 तरूणांनी ही संकल्पना सुरू केली आहे. त्यांनीच हा हायजेनिक पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या हा व्यवसाय त्यांच्या घरातील महिला सांभाळत आहेत. त्यातून काही तरुणांना रोजगार मिळत असल्याचंही पाणीपुरी व्यावसायिका सारीका तुपकारी यांनी सांगितलं आहे.
https://twitter.com/
पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी येथे आता क्लीन अँड क्रंची हायजेनिक पाणीपुरी मिळत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात पाणीपुरी लव्हरसाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळं अनेकांची दुकानावर गर्दी होत आहे. ऑटोमेटीक मशीन असल्यानं स्पर्शविरहीत पाणीपुरी ग्राहकांना या ठिकाणी खायला मिळत आहे. मशीनच्या नोजल जवळ सेंसर बसवण्यात आले आहेत. त्यामुळं आवडीच्या प्लेवरचं पाणी पुरीमध्ये भरता येतं, तेही स्पर्श न करता. या पाणीपुरीनं आता सर्वांच लक्ष वेधलं आहे.