पिंपरी-चिंचवड न्यूज (Pimpri Chinchwad News) :बहुजननामा ऑनलाइन- मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या टोळक्याने सुरक्षारक्षकांना चाकू व मिरची पुड दाखवून त्यांच्या अंगावर चादर टाकून दाबून (pimpri chinchwad crime news) ठेवले. इतरांनी कंपनीतील २५ लाख ८७ हजार रुपयांचा माल दरोडा टाकून लुटून नेला. ही घटना चाकण (Chakan) येथील चिंबळी फाटा(Chimbali fata) येथील द व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया या कंपनीत (The V Tech Industries India Company) २५ जूनला मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शशीमोहन नरेंद्रदेव शर्मा (वय ३६, रा. भोसरी) यांनी चाकण पोलिसां(Chakan Police)कडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ६ पुरुष व २ स्त्रीया व त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीत मध्यरात्रीच्या सुमारास नागेश वाकोडे, विनोद कोळेकर हे सुरक्षा रक्षक(Security guard) काम करीत होते.
त्यावेळी ६ पुरुष व २ स्त्रीया व त्यांचे इतर साथीदार कंपनीत विनापरवाना शिरले.
त्यांनी सुरक्षा रक्षकांना हाताने मारहाण करुन त्यांना चाकूचा व मिरची पावडरचा धाक दाखविला.
मिरची पावडर टेबलावर टाकली. त्यानंतर त्यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना
चादरीने जागीच दाबून ठेवले. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी कंपनीचे सीसीटीव्ही, लोखंडी शटर,
गेट उचकटून त्याचे नुकसान केले. कंपनीतील ब्रास, कॉपर, पी. बी. कॉपर मिक्स, कॉपर रॉड, कॉपर स्क्रॅप व तीन मोबाईल
असा २५ लाख ८७ हजार २४७ रुपयांचा माल जबरदस्तीने दरोडा टाकून लुटून नेला.
Web Title : pimpri chinchwad crime news | The gang robbed the company by throwing a sheet over the body of the security guard; 25 lakh worth of material stolen
Covid-19 Vaccine | भारताने मोडला लसीकरणाचा आपलाच विक्रम, एका आठवड्यात दिल्या सुमारे 4 कोटी व्हॅक्सीन
nagpur Police |वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा डर्टी पिक्चर ! तीन महिला होमगार्डशी अश्लील चाळे