बहुजननामा ऑनलाईन
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने बदली होऊन आलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नियुक्त्या केल्या आहेत.
सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले-पाटील यांची विशेष शाखा येथे तर नंदकुमार पिंजण यांची सहायक पोलिस आयुक्त प्रशासन येथे नियुक्ती केली असून पिंजण यांच्याकडे सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी येथील अतिरिक्त पदभार दिला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सोलापूर लोहमार्ग येथून सहायक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले-पाटील आणि राज्य गुप्त वार्ता, पुणे येथून नंदकुमार पिंजण यांची बदली झाली. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणारे रामचंद्र जाधव आणि अश्विनी केदार यांची बदली झाली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांनी पदभार सोडला असल्याने चाकण सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देहूरोड, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.