बहुजननामा ऑनलाईन – आता लवकरच तुम्ही तुमच्या पीफचे संपूर्ण पैसे एनपीएसद्वारे स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवू शकता असा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही नवीन नोकरी स्वीकारत असाल तर अशा वेळी तुम्हाला कुठली ईपीएफ स्कीम हवी ती दिली जाणार आहे. या प्रस्तावाचा ड्राफ्ट सरकारने तयार केला आहे. यावर निर्णय घेण्यासाठी २४ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. नॅशनल पेंशन स्कीम हे एक सरकारी निवृत्ती स्कीम आहे. ही स्कीम १ जानेवारी २००४ रोजी केंद्र सरकारने लॉंच केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही स्कीम अनिवार्य आहे. तर २००९ नंतर ही योजना खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी देखील सुरु करण्यात आली होती.
काय आहे स्कीम
एनपीएसमध्ये पीएफचे पैसे ट्रान्सफर करण्याचा पर्याय यामध्ये तुम्हाला मिळेल. स्टाॅक मार्केटमध्ये याद्वारे हे पैसे गुंतवले जातील. त्याचबरोबर नव्या नोकरीत तुम्हाला फक्त ईपीएफ नाही तर एनपीएसचाही पर्याय यामध्ये तुम्हाला मिळेल. यासंबंधी निर्णय हे २४ सप्टेंबर २०१९ ला होईल.
जर तुम्ही एनपीएस मध्ये गुंतवणूक केली तर याचा फायदा तुम्हाला करातही मिळते. हि सवलत तुम्हाला १.५ लाख रुपयां पर्यंत मिळेल. तसेच कलम ८० सीसीडी प्रमाणे अतिरिक्त ५० हजार रुपयांच्या कपातीचा फायदा ही मिळतो. जर तुम्हाला या योजनेचा फायदा निवृत्तीनंतरही मिळवायचा असेल तर ईपीएफ तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुमच्याकडे एनपीएसच अकाउंट असणे गरजेचे आहे. जर तुम्हच्याकडे एनपीएसच अकाउंट नसल्यास तुम्ही एनपीएसच्या पोर्टलवरून नवीन अकाउंट उघडू शकता. एनपीएसवर अकाउंट उघडण्यासाठी npstrust.org.in या लिंकवर तुम्ही क्लीक करू शकता.