मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गुरुवारी (1 एप्रिल) घरगुती तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज लागोपाठ दुसर्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. यापूर्वी मंगळवारी पेट्रोल 22 पैसे आणि डिझेल 23 पैसे प्रति लीटर पर्यंत स्वस्त झाले होते. महाराष्ट्रात आज परभणीत सर्वात जास्त
99.14 रुपये प्रति लीटरने पेट्रोल विकले जात आहे. त्याखालोखाल नांदेडचा क्रमांक आहे, येथे पेट्रोल 99.02 रूपये प्रति लीटरने विकले जात आहे.
मागील आठवड्यात सुद्धा 2 वेळा इंधनाच्या किंमतीमध्ये कपात झाली होती. यामुळे पेट्रोल 61 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले होते. मागील महिन्यात कच्चे तेल महागल्यानंतर सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर तीन हप्त्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले.
पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर
मुंबई 96.98 – 87.96
पुणे 96.68 – 86.33
ठाणे 96.48 – 86.11
अहमदनगर 96.90 – 86.55
औरंगाबाद 97.13 – 86.76
धुळे 97.36 – 87.00
कोल्हापूर 96.80 – 86.47
नाशिक 96.66 – 86.32
रायगड 97.60 – 87.19
प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.
असे वाढतात पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टी मिळवल्यानंतर दर जवळपास दुप्पट होतात. जर केंद्र सरकारची एक्साइज ड्यूटी आणि राज्य सरकारांचा वॅट हटवला तर डिझेल आणि पेट्रोलचा रेट जवळपास 27 रुपये लीटर राहिल, परंतु केंद्र असो की राज्य सरकार, दोन्ही कोणत्याही स्थितीत टॅक्स कमी करत नाहीत. कारण महसूलाचा एक मोठा भाग येथून येतो.
रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर
प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.
एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती
तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.
कंपनी आणि क्रमांकाची सुविधा
1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249
2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222
3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122
वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता