पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांनी सलग सहा दिवस भाववाढ केल्यानंतर मंगळवारी एक दिवस ग्राहकांना दिलासा दिला.
त्यानंतर आज बुधवारी पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात भाववाढ केली आहे.
पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आज पेट्रोलचा दर ११३.२७ रुपये लिटर (Petrol Diesel Price Pune) इतका झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डिझेलच्या दरातही आज लिटरमागे ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा आजचा दर १०२.६२ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात आज प्रति लिटर ३३ पैशांनी वाढ केली गेली आहे.
पुण्यात आता पॉवर पेट्रोलचा दर ११६.९५ रुपये लिटर झाला आहे.
Web Title :- Petrol Diesel Price Pune Today News.