पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांनी सोमवारी सीएनजीच्या दरात 2 रुपयांची भाववाढ केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Pune) केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 24 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर 108.19 रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरातही लिटरमागे 32 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
पुण्यात डिझेलचा दर आता 96.82 रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलही प्रति लिटर 24 पैशांनी महागले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पॉवर पेट्रोलचा आजचा भाव 111.87 रुपये लिटर झाला आहे. पेट्रोल आता 110 रुपये लिटरकडे झेपावत असतानाच डिझेलचा दरही शंभरी गाठण्याकडे चालला आहे.
ही भाव वाढ अशीच सुरु राहिली तर येत्या 15 दिवसांच्या आत डिझेलचे दर शंभरी गाठतील.
त्याचा माल वाहतूकीवर परिणाम होऊन सर्वच वाहतूक महाग होईल. त्यामुळे महागाईमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
Web Title :- Petrol Diesel Price Pune | Petrol-diesel price hike again; Find out today’s fuel rates in Pune city.