पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांची इंधन दरवाढ कायम आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये डिझेलने शतक पार करत सीमोल्लंघन केले असून पुण्यात डिझेलचे शतक केवळ २८ पैशांनी दूर आहे.
पेट्रोल आज लिटरमागे ३३ पैशांनी महागले. पुण्यातील पेट्रोलचा दर आता प्रति लिटर ११०.५८ रुपयांवर गेले आहे. (Petrol Diesel Price Pune)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याचबरोबर डिझेलच्या दरात लिटरमागे ३६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर ९९.७२ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरातही आज लिटरमागे ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर आता ११४.२७ रुपये लिटर झाला आहे. सीएनजीचा दर ६२.१० रुपये किलोवर आज स्थिर आहे. (Petrol Diesel Price Pune).
web title: petrol diesel price pune 4.
Pune Police | पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द