नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कपात करण्यात आली आहे, त्यामुळे सणासुदीच्या हंगामात सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे पेट्रोल १८ पैशांनी आणि चेन्नईमध्ये १९ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले. त्याचबरोबर दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे डिझेलच्या दरात आठ पैशांची घसरण झाली आहे, तर चेन्नईमध्ये नऊ पैसे प्रतिलिटर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७४.३३ रुपये आहे
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमधील पेट्रोलचे दर अनुक्रमे ७४. ३३ रुपये, ७६.९६ रुपये, ७९. ९३ रुपये आणि ७७.२१ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले आहेत. चार महानगरांमध्ये डिझेलचे दरही अनुक्रमे ६७.३५ रुपये, ६९.७१ रुपये, ७०. ६१ रुपये आणि ७१.१५ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आले आहेत. या दोन दिवसांत दिल्लीत पेट्रोल २८ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले आहे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १४ पैशांची घट झाली आहे.
कच्च्या तेलाच्या घसरणमुळे आणखी घट होणार
अँजेल ब्रोकिंगचे उप-उपाध्यक्ष(ऊर्जा आणि चलन संशोधन) अनुज गुप्ता म्हणाले की, सणासुदीच्या काळात फळ आणि भाजीपाल्यापासून सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत, ज्यामुळे पूर्वीच्या तेलाच्या किंमती वाढण्यासही हातभार लागला आहे. अशा परिस्थितीत आता तेलाच्या किंमतीत कपात सुरू केल्याने सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली आल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल, असे गुप्ता यांनी सांगितले.
१६ सप्टेंबर नंतर कच्या तेलात १४ डॉलरने घसरण झाली आहे
१४ सप्टेंबर रोजी सौदी अरेबियाची तेल कंपनी सौदी अरामकोवर १६ सप्टेंबर रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत २८ वर्षानंतरची सर्वात मोठी एक दिवसीय वाढ होती, जेव्हा ब्रेंट क्रूडची किंमत ७१.९५ डॉलर प्रति बॅरेल होती. परंतु तेव्हापासून ब्रेंटच्या किंमतीत प्रति बॅरल जवळपास १४ डॉलर ची घट झाली आहे.
Visit : bahujannama.com