मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या लोकसभा निवडणूकीला आणि २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाण सोशल मिडियाचा वापर करण्यात आला. सोशल मिडियावर एवढा भर देण्यात आला की जिथे तिथे प्रचार आणि प्रचारच दिसून येत होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांकडून सारासार सोशल मिडियाचा वापर करण्यात आला. त्यातच भाजपाने साकारलेला ‘रम्या’ सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करत आहे. यावेळी रम्याचे डोस या मालिकेतून भाजपाने राज ठाकरेंवर निशाण साधला आहे.
रम्या म्हणतो, जिथे कार्यकर्ते 'नांद'त नाही त्या पक्षाचं काही खरं नाही!
#रम्याचेडोस@mnsadhikrut pic.twitter.com/84nQtqxc8G
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 4, 2019
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी पक्षांतर करत आपल्या प्रमुख नेत्यांना धक्का दिला. सोशल मीडियावर मनसेचा चेहरा बनलेल्या नितीन नांदगावकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडीवर भाजपने मनसेला चांगलाच डोस दिला आहे. रम्याचे डोस या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने नांदगावकरांच्या पक्षांतरावरुन राज ठाकरेंना डोस दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं नांदगावकर म्हणाले. तसेच नितीन नांदगावकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वखाली आपण राज्यभर भगवा फडकावणार आहोत. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून आपलं काम चालूच असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Visit : bahujannama.com