बहुजननामा ऑनलाईन- वाहतुकीचा नियम लागू करुन दोन दिवसही झाले नाही तर लगेचच या विरोधात आवाज उठविला जात आहे. दिल्लीत राहणाऱ्या आणि गुडगाव कोर्टात काम करणाऱ्या एका व्यक्तीला 23,000 रुपये दंड लागू झाला आहे पण त्याच्या स्कूटीची एकूण किंमत सध्या 15,000 रुपये आहे.
Dinesh Madan: Value of my scooty is around 15,000.I even got a copy of RC on WhatsApp from home but by then he had printed.The amount could have been less if he had waited for a while. I want that fine should be relaxed. From now on I will always carry my documents. https://t.co/dJo5BeIcGD
— ANI (@ANI) September 3, 2019
गीता कॉलनी, दिल्ली येथे राहणारा दिनेश मदन हरियाणाच्या गुडगाव कोर्टात काम करतो. सोमवारी, जेव्हा तो आपल्या 2015 मॉडेलच्या स्कूटीसह काही छोट्या कामासाठी घराबाहेर पडला, तेव्हा त्याला वाहतूक पोलिसांनी गाठले. विना हेल्मेट घराबाहेर निघालेल्या दिनेशला पोलिसांनी गाडीचे रजिस्ट्रेशन, परवाना, एअर पोल्यूशन एनओसी, हेल्मेट आणि थर्ड पार्टी विम्यासंदर्भात विचारले असता त्यांच्याकडे त्यावेळी काही नव्हते. काही काळानंतर ते कागदपत्रे देतील, असे दिनेश यांनी सांगितले पण तोपर्यंत वाहतुक पोलिसांनी 23 हजार रुपयांची पावती फाडली होती.
मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 213 (5) (ई) च्या विविध कलमांतर्गत हे चलन बनविण्यात आले. विना हेल्मेट 1000 रुपये, ड्रायव्हिंग परवान्याशिवाय 5 हजार रुपये, विमेशिवाय 2 हजार रुपये, नोंदणीशिवाय 5 हजार रुपये आणि एअर पोल्यूशन नसलेल्या एनओसीसाठी 10 हजार रुपये अशा प्रकारे एकूण 23 हजार रुपयांची पावत्या बनविण्यात आल्या.
त्यावेळी 23 हजार रुपये त्यांच्याकडे नव्हते, म्हणून वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी ताब्यात घेतली आणि हे प्रकरण कोर्टात नेण्यात आले. आता दिनेशला असा पेच पडला आहे की, 15 हजार रुपयाची स्कूटी सोडविण्यासाठी 23,000 भरावे की नवीन गाडी खरेदी करावी. यासाठी दिनेशला कोणताच निर्णय घेता येत नाही तो गोंधळून गेला आहे.