मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- एका विद्यार्थ्याशी संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात एका महिला शिक्षिकेला २ वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण इंग्लंडच्या लिवरपूल मधील आहे. लिवरपूल क्राउन कोर्टाचे न्यायाधीश गैरी वुडहॉलने ४२ वर्षीय महिला शिक्षक बिटी मिलिगन बद्दल सांगितले की, ‘तू त्या विधार्थ्यासोबत लैंगिंक संबंध ठेवू इच्छित होती मी त्यासाठी पूर्णपणे संतुष्ट आहे.’
बिट्टी नावाची टीचिंग असिस्टेंटने शाळेत जॉईन झाल्याच्या काही दिवसांनी ती १५ वर्षाच्या विद्यार्थ्याकडे आकर्षित होऊ लागली. नियमांचे उल्लंघन करत तिने विद्यार्थ्याचा मोबाईल नंबरही घेतला. महिला शिक्षिका विद्यार्थ्याला आक्षेपार्ह मॅसेज करत होती. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत रात्र घालविण्याच्या उद्देशाने हॉटेल बुक केले तेव्हा ही माहिती उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले.
ही महिला विवाहित असून २ मुलांची आई आहे. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर तिचा पती तिच्यापासून वेगळा झाला. त्या महिलेच्या नात्याबद्दलची माहिती शाळेच्या दोन स्टाफकडून देखील समोर आली होती. टीचिंगच्या आधी महिला एक ब्यूटी मसाजर देखील होती. या महिलेने कोर्टात सांगितले की विद्यार्थ्याला अनेक अडचणी होत्या आणि ती त्याला विशेष मदत करत होती. हॉटेलच्या खोलीची बुकिंग करून त्याने विद्यार्थी-शिक्षकाची हद्द ओलांडली, परंतु तिने लैंगिक संबंध बनवण्याची इच्छा असल्याचे मात्र तिने नाकारले.