पुणे/हडपसर : बहुजननामा ऑनलाईन – Patthe Bapurao Award | पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ लोकनाटय़ कलावंत अमन तांबे पुणेकर यांना जाहीर झाला आहे. लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी नृत्यांगणा रूपा बारामतीकर यांना व पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ प्रसिध्द ढोलकीपटू गोविंद कुडाळकर यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, अध्यक्ष देविदास पाटील व मित्रावरुण झांबरे यांनी दिली. (Patthe Bapurao Award)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुरस्काराचे हे २४ वे वर्ष आहे. शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार २१ हजार रुपये, डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार १५ हजार रुपये आणि बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि.१७ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी दुपारी एक ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
लोककला क्षेत्रासाठी योगदान देणार्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने शकुंतला नगरकर, छाया खुटेगावकर, संजीवनी मुळे, रघुवीर खेडकर, सरस्वतीबाई कोल्हापूरकर अशा जुन्या पिढीतील नामवंत कलावंताना सन्मानित करण्यात आले आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, डाॅ.शंतनु जगदाळे, रेश्मा परितेकर, रामदास खोमणे, संदीप घुले, बापू जगताप, आकाश वाकचौरे यांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लोक कलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कार्यक्रम प्रवेशिका मोफत आहेत. महिलांसाठी राखीव जागा आहेत.
रेश्मा वर्षा परितेकर पार्टी, शाहीर सगनभाऊ ग्रुप जेजुरी, आर्यभूषण थिएटर ग्रुप पुणे, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट,
पुष्पराज कलाकेंद्र जेजुरी, अशा संगीत पार्टींचे कलावंत आपली कला लावणी महोत्सवात सदर करणार आहेत.
Web Title :- Patthe Bapurao Award | Patthe Bapurao Pratishtha Award Announced! Winner of Tambe, Baramatikar and Kudalkar Awards; Patthe Bapurao Award to Aman Tambe, organization of planting festiva
हे देखील वाचा :
Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले..