पठ्ठे बापुराव पुरस्कार (pathe bapurao puraskar) २१ हजार रुपये, भास्करराव खांडगे पुरस्कार १५ हजार रुपये, बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार ११ हजार रूपये स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्काराचे हे २३ वर्ष आहे. लोककला क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास हे पुरस्कार दिले जातात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बुधवार दिनांक २२ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे (balgandharva rang mandir pune) येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत ‘पुणे लावणी महोत्सवाचे’ (pune lavani mahotsav) आयोजन करण्यात आलेले (Pune) आहे. शाहीर अमर पुणेकर (shahir amar punekar) ,जय अंबिका कला केंद्र सणसवाडी (Jai Ambika Kala Kendra Sannaswadi), कविता बंड निर्मित ढोलकीचा खणखणाट घुंगरांचा छनछनाट ,आर्यभूषण थिएटर पुणे (aryabhushan theatre pune) येथील लोककलावंत आपली कला सादर करणार आहेत. महिलांसाठी बाल्कनी राखीव ठेवण्यात आलेली आहे. लोककलेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे.
Web Title :- Pathe Bapurao Puraskar | Veteran Tamasha artist Raghuveer Khedkar awarded ‘Paththebapurao Award’; Lavani singer and dancer Pushpa Satarkar and Shahir Sureshkumar Vairalkar also get Award