PPF मध्ये तारखेला महत्त्व
पीपीएफमध्ये कोणत्या तारखेला गुंतवणूक (PPF Investment) करता आणि कोणत्या तारखेला तुम्ही पैसे जमा करता त्यानुसार व्याजदर ठरतो. पीपीएफमध्ये व्याजदर (Interest rate) दरवर्षी मिळत असतो, मात्र चक्रवाढ व्याजाची गणना दर महिन्याला केली जाते. पीपीएफ खात्याच्या नियमांनुसार, पीपीएफ खात्यावरील व्याज 5 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात जमा असलेल्या किमान शिलकीच्या आधारावर मोजले जाते.
अन्यथा परताव्यावर होईल परिणाम
जर एखाद्या पीपीएफ खातेधारकाने कोणत्याही महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत त्याच्या पीपीएफ खात्यात पैसे जमा केले, तर तो त्या महिन्यासाठी पीपीएफ व्याजासाठी देखील पात्र असेल. मात्र तुम्ही 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर तुम्हाला व्याजाचे नुकसान होईल. याचा परिणाम तुमच्या परताव्यावर होईल. दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात पैसे जमा करणे आवश्यक आहे.
PPF खात्याचे फायदे
दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. निवृत्तीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. पीपीएफमधून मिळणारे उत्पन्न करमुक्त (Tax free) आहे. तुम्ही आयकर कलम 80C (Income tax section 80C) अंतर्गत यावर कर सूट देखील घेऊ शकता. यावर मिळणारे व्याज हे करमुक्त आहे. सध्या पीपीएफ वर 7.1 टक्के व्याज आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयापर्यंत कर कपातीचा लाभ मिळतो. तसेच मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम (Maturity amount) या दोन्हींवर कर सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ मॅच्युरिटीच्या वेळीच नाही तर वार्षिक आधारावर करमुक्तीचा हा एक चांगला पर्याय आहे. कर आकारणीच्या ट्रिपल ई मॉडेलमुळे हा चांगला परतावा देणारे प्रोडक्ट मानले जाते.
किती पैसे जमा करावे लागतील?
PPF मध्ये, तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागतील. तसेच तुम्ही एका वर्षात तुमच्या खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करु शकता. हे खाते 15 वर्षाच्या लॉक-इन कालावधीसह येते. सध्या तुम्हाला पीपीएफ अंतर्गत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते.
Web Title :- PPF Investment | investing in ppf then be sure to deposit money on this date otherwise impact on return
Brown Rice Benefits | व्हाईट राईसऐवजी का खावा ब्राऊन राईस? डायबिटीजमध्ये सुद्धा लाभदायक; जाणून घ्या