बहुजननामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत दिसत आहे. त्याचे कारण परिणीतीने आज टॉपलेस फोटोशूट केले आहे. महत्वाचे हे फोटोशूट प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर डबू रत्नानी यांनी केले आहे. परिणीतीचा हा टॉपलेस फोटो पाहून चाहते सुन्नच पडल्याचे बघायला मिळाले आहेत. दरम्यान या फोटोला खूप जणांनी पसंती दाखवील असून याफोटोची सर्वीकडे चर्चा बघायला मिळत आहे.
डबू रत्नानी दरवर्षी आपले सेलिब्रेटी कॅलेंडर प्रकाशित करत असतो यावर्षीच्या कॅलेंडरसाठी त्याने परिची निवड केली आहे. तो हा फोटो असून या फोटोमध्ये एका पिवळ्या रंगाच्या लहानशा गाडीत बसलेली दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
परिणीतीच्या व्रर्कफंट बाबत बोलायचे झाल्यास तिचा आताच जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सायना हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.