परभणी : बहुजननामा ऑनलाईन – Parbhani Crime News | कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत शाळेकडे निघालेल्या दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या मानवत शहरामध्ये घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातानंतर आरोपी ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. (Parbhani Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ असे या अपघातातील मृत शिक्षकांचे नाव आहे. ते परभणीच्या मानवत शहरातील शकुंतला विद्यालयात कार्यरत होते. ते घटनेच्या दिवशी दुचाकी क्रमांक एम एच 22 एएच 7031 यावरून आपल्या शाळेकडे जात होते. यादम्यान कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावरून पाथरीवरून परभणीला जाणाऱ्या एमएच 13 आर 3684 या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला मानवत शहराजवळ जोराची धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये दुचाकीवरील दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी ट्रकचालकाने घटनास्थवरून पळ काढला. (Parbhani Crime News)
या अपघाताची माहिती समजतात मानवत शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
अपघातामध्ये दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या दोन्ही शिक्षकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मानवत येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. मानवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Parbhani Crime News | 2 teacher dies as truck hits bike on national highway
हे देखील वाचा :
Pune Crime News | संकष्टी चतुर्थीला ‘दगडुशेठ’जवळ ‘वसुली’चा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी निलंबित
Sai Tamhankar | सई ताम्हणकरला सिनेसृष्टीतील महत्त्वाचा पुरस्कार; पोस्ट शेअर करत दिली माहिती