मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांच्या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने राज्यातील पोलिसांऐवजी (state police) अन्य एजन्सीकडून तपास घेण्यास सांगितले आहे.
तसेच, परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात सध्यातरी कोणतीही चार्जशीट (Chargesheet) दाखल न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत. याशिवाय, त्यांना अटक न करण्याच्या आदेशही न्यायालयाने कायम ठेवला आहे.
परमबीर सिंहांना तुर्तास अटकेपासून संरक्षण
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह (Parambir Singh) यांना अटक न करण्याचे आदेश यापूर्वीच्या सुनावणीत दिले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अटक न करण्याची मुदत आज संपत असल्याने या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. यामध्ये परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना तुर्तास अटकेपासून संरक्षण देत तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील सुनावणी 11 जानेवारीला
सीबीआयने (CBI) न्यायालयात म्हटले की, महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह यांच्यावर नोंदवलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केल्यास आमची हरकत नाही. त्यावर न्यायालयाने सीबीआयला एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. इतर पक्षकारांना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.
तपास सुरु राहणार
न्यायालयाने म्हटले की, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तपास राज्य पोलिसांनी न करता अन्य एजन्सीद्वारे केला जावा असे प्रथमदर्शनी मत आहे. परमबीर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांकडून कोणतेही चलन दाखल केले जाणार नसले तरी तपास सुरुच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सिंह यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणी (Ransom), फसवणूक (fraud) यासरखे गुन्हे दाखल असून त्याचा तपास सुरु आहे.
Web Title :- Parambir Singh | Big relief parambir singh supreme court has ordered not file any chargesheet against parambir singh
EPFO | 7 लाखापर्यंत EDLI Scheme मध्ये मिळतो लाभ, जाणून घ्या कोण कसे करू शकतात क्लेम
Narayan Rane | नारायण राणेंचा खोचक टोला; म्हणाले – ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?’