Pankaja Munde | ‘पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं’ ! विधानपरिषदेसाठी भाजपने पत्ता कट केल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून आमंत्रण

Pankaja Munde | BJP leader pankaja munde currently i am unemployed so pankaja mundes statement

जालना : बहुजननामा ऑनलाइन – Pankaja Munde | विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Elections 2022) भाजपने (BJP) पाच नावे घोषित केले आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी देण्यात आली नाही. उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच शिवसेनेकडून (Shivsena) त्यांना आमंत्रण आलं आहे.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिले आहे. “पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंद होईल, त्यांचं स्वागतच करु, असं म्हणत खोतकरांकडून पुन्हा एकदा आपली इच्छा प्रकट करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंडे परिवाराला भाजप जी वागणूक देत आहे, ते दु:खद असल्याचं,” देखील त्यांनी म्हटलं आहे.

अर्जुन खोतकर म्हणाले, “ठाकरे परिवाराने नेहमी मुंडे कुटुंबाचा सन्मान केला आहे.
या पक्षात आता त्यांना हे दिवस पाहावे लागणे यापेक्षा दुसरं दु:ख नाही. जर त्यांना संधी मिळाली तर मराठवाडा आणि आम्हालाही आनंद झाला असता. परंतु, पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या हातात नाही. हे पक्षप्रमुख आणि पक्षातील वरिष्ठ नेते यासंदर्भात अधिक अधिकाराने बोलू शकतात. त्या शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंदच होईल.” असं ते म्हणाले.

Web Title :- Pankaja Munde | shivsena leader arjun khotkar says pankaja munde should join shivsena after bjp denied vidhan parishad election 2022 candidature

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update