बहुजननामा ऑनलाइन टीम – पालघर येथील अष्टविनायक नागरी पतसंस्थेच्या संचालिका साधना चौधरी (वय ५७) यांचा हत्येचे गुढ उकलण्यात पालघर पोलिसांना यश(murder case) आले आहे. या खुन प्रकरणी पोलिसांनी रात्री एकाला अटक केली आहे.
विनोद त्रिवेदी असे त्याचे नाव आहे. तो पतसंस्थेच्या समोरच रहायला आहे.
अष्टविनायक नागरी पतसंस्थेच्या संचालिका साधना चौधरी या ९ जानेवारी रोजी दिवसभर पतसंस्थेत होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने घरच्यांनी पतसंस्थेत जाऊन पाहणी केली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या होत्या. ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साधना चौधरी या एकट्याच उशिरापर्यंत पतसंस्थेत होत्या. मग, त्यांचा खुन कोणी केला असा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पोलिसांनी पतसंस्थेतील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून या खुनाचा छडा लावला असून आज पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक याबाबतची माहिती देणार असल्याचे समजते.