पालघर : बहुजननामा ऑनलाईन – Palghar Crime News | पालघरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पाहुण्यांना घरी सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. बोईसर मार्गावर उमरोळी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. इसरार खान (वय 23) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताच्या घटनेमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली आहे. (Palghar Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय घडले नेमके?
कैफ इसरार खान हा नवविवाहित तरुण त्याचा चुलत भाऊ अल्तमस जुनेद खान याच्या हळद समारंभासाठी गुरुवारी बोईसर या ठिकाणी आला होता. हा समारंभ आटोपल्यानंतर कैफ आपल्या काही नातेवाईकांना सोडून पालघर या ठिकाणी परतत होता. यादरम्यान बोईसर- पालघर मार्गावर उमरोळी येथे असलेल्या वळणावर अचानक कारचा टायर फुटला त्यामुळे कैफ याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात कैफ गंभीर जखमी झाला. पहाटे 3 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. (Palghar Crime News)
या अपघातानंतर कैफला तातडीने उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात कारच्या पुढील भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.
कैफ हा काँग्रेस पक्षाचे पालघर मधील पदाधिकारी असलेले इसरार खान यांचा मुलगा आहे.
महिनाभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. कैफचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना
मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Web Title : Palghar Crime News | palghar boisar road youth died in a four wheeler accident
हे देखील वाचा :
Satara Crime News | येणपेमध्ये रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू