बहुजननामा ऑनलाइन टीम – पाकिस्तान (Pakistan) मधील दहशतवादविरोधी एका कोर्टाने टेरर फंडिंग (Terror Funding) च्या दोन प्रकरणात हाफिज सईद (Hafiz Saeed) च्या नेतृत्वात जमात-उद-दावाच्या प्रवक्त्याला 32 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. उल्लेखनीय म्हणजे हाफिज सईद हा 2011 मध्ये मुंबईत अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. टेरर फंडिंगच्या प्रकरणात कोर्टाने सईदच्या नातेवाईकासह जमात-उद-दावाच्या इतर दोन नेत्यांनाही दोषी ठरवले.
हाफिज सईदच्या नातेवाईकाला झाली शिक्षा
त्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दहशतवादविरोधी कोर्टाचे न्यायाधीश एजाज अहमद बुत्तार यांनी दोन प्राइमरी प्रकरणात जमात-उद-दावा (Jammat-ud-Dawah) चा प्रवक्ता याह्या मुजाहिदला 32 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्याचबरोबर प्रोफेसर जफर इकबाल आणि प्रोफेसर हाफिज अब्दुल रहमान मक्की (सईदचे नातेवाईक) यांना अनुक्रमे 16 आणि एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.’
इतर प्रकरणात यांच्याविरुद्ध आरोप निश्चित
अधिकाऱ्याने सांगितले, ‘टेरर फंडिंग संदर्भातील इतर प्रकरणात जमात-उद-दावाचे अन्य दोन नेते अब्दुल सलाम बिन मोहम्मद आणि तुकमान शाह यांच्याविरूद्ध आरोप निश्चित केले गेले आहेत. कोर्टाने 16 नोव्हेंबर रोजी फिर्यादींना आपले साक्षीदार उपस्थित करण्यास सांगितले आहे.’