बहुजननामा ऑनलाइन टीम – PAK MLA Sania Ashiq | माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आणि PML (N) (Pakistan Muslim League-N) च्या प्रमुख नेत्या मरियम नवाज (maryam nawaz) यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या आमदार सानिया आशिक (PAK MLA Sania Ashiq) यांचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार समजताच सानिया यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आणि धमकावल्याच्या गुन्ह्याखाली एका व्यक्तीला अटक केली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील तक्षशिला येथील सानिया (PAK MLA Sania Ashiq) या आमदार आहेत. पाकिस्तानमधील ARY News या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एका रुममध्ये शूट करण्यात आलेला एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला नग्नावस्थेत दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला आमदारच असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ महिला आमदाराच्या नावानेच व्हायरल केला जात आहे. दरम्यान हा प्रकार संबंधित महिला आमदार सानिया (PAK MLA Sania Ashiq) यांच्या लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान सानिया यांनी यपूर्वीही २६ ऑक्टोबरला टिकटॉक आणि अन्य सोशल नेटवर्किंग व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ संदर्भात एका अज्ञात व्यक्तीविरोधात तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सायबर विभागाकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
A targeted harassment strategy starting with hundreds of threatening calls,3rd grade songs on tiktok, replusive posts on fb, random clips associated to me;has now culminated at using picture of my father literally during last hours of his life,moments I can never erase frm memory
— Sania Ashiq (@SaniaaAshiq) October 26, 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना एका ट्विटच्या माध्यमातून सानिया यांनी संबंधित व्यक्तीने माझे व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल करण्याबरोबरच सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. व्हिडीओत दिसणारी महिला माझ्यासारखी दिसते, असा दावा केला आहे. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी धमकावणारे शेकडो कॉल, टिकटॉकवरील अश्लील गाणी, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट आणि माझ्याशी संबंधित कोणतेही व्हिडीओ व्हायरल करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
Web Title :- PAK MLA Sania Ashiq | pakistan mla sania ashiq alleged objectionable video viral accused arrested marathi news bahujannama.