बहुजननामा ऑनलाईन टीम : बेल्जियममध्ये एका घरात वाढदिवसाच्या पार्टीसाठी अनेक जण जमले असून मोठ्याने गाणी वाजवत आहेत. तसेच नाईट कर्फ्यू आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार जवळच्या रुग्णालयाने पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला असता समोरचे दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. या घरामध्ये एकाच वेळी 50 जण सामूहिक पद्धतीने लैंगिक संबंध ठेवताना आढळून आले. ही घटना बेल्जियमच्या व्हिक्टोन प्रांतामध्ये सेंट मार्ड नावाच्या गावामध्ये घडली आहे. पोलिसांनी घरातील या सर्व व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची कोरोना चाचणी केली आहे. पोलिसांना या घरामध्ये अंमली पदार्थही सापडले आहेत.
युरोपातील इतर देशांप्रमाणेच बेल्जियममध्येही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशामध्ये नाईट कर्फ्यू आणि क्वारंटाइनसंदर्भातील नियम पुन्हा लागू केले आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही यासंदर्भात देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. असे असतानाच देशाची राजधानी असणाऱ्या एका घरामध्ये एकाच वेळी 50 जण सामूहिक पद्धतीने लैंगिक संबंध ठेवताना आढळून आले.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या रुग्णालयामधून फोन आला होता. एका घरामध्ये मोठ्याने गाणी वाजत असून अनेकजण तिथे एकत्र जमा झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी हा छापा टाकला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर एका 28 वर्षीय फ्रेंच महिलेच्या मालकीचे आहे. या महिलेने पोलिसांना वाढदिवसासाठी 20 पाहुणे येतील अशी माहिती आधीच देऊन ठेवली होती. मात्र पोलिसांनी धाड टाकली तेव्हा घरात 50 हून अधिक माणस होती. यापैकी अनेकजण हे नग्नावस्थेतच होते. घरात उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ड्रग्सचे सेवन करण्याबरोबरच सामूहिक सेक्सही करताना आढळून आले. अटक केलेले बहुतेक सर्वचजण फ्रेंच नागरिक आहेत.घरातील या पार्टीसाठी कॉलगर्ल्स आणि देहविक्री करणाऱ्या पुरुषांनाही बोलवले होते.