बहुजननामा ऑनलाइन – भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार अॅपचे नवीन वर्जन बाजारात आणले आहे. या नवीन अॅपचे नाव एमएधार (mAadhaar)आहे जे अँड्रॉइड किंवा आयओएस युजर्स सहजपणे डाउनलोड करू शकतील. हे अॅपल आणि अँड्रॉइड प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते. या अॅपच्या मदतीने आपण सहजपणे आपल्या आधारचा रिप्रिंट रिक्वेस्ट करू शकता. आधार रिप्रिंटसाठी तुम्हाला सेवा शुल्क म्हणून 50 रुपये द्यावे लागतील. आपल्या रिक्वेस्टनंतर ते 15 दिवसांच्या आत वितरित केले जाईल. यावेळी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की नवे प्रिंटेड आधार केवळ नोंदणीकृत पत्त्यावर पाठविले जाईल.
ही सर्व वैशिष्ट्ये नवीन अॅपवर उपलब्ध
नवीन आधार अॅप वापरण्यास सोपे आणि सुलभ आहे. या नवीन अॅपमध्ये आपण ऑफलाइन KYC, QR कोड स्कॅन, ऑर्डर रीप्रिंट, पत्ता अपडेट करणे, आधार पडताळणी, ईमेल पडताळणी, यूआयडी रिट्रीवचे रिक्वेस्ट यासारख्या गोष्टी सहजपणे करू शकता. या अॅपद्वारे आपण बर्याच प्रकारच्या ऑनलाइन रिक्वेस्ट स्थिती सहजपणे तपासू शकता.
Updated your Aadhaar recently or requested for a Reprint or Address Validation Letter? Check status of your Aadhaar service request from your #mAadhaar app.
For more services, get the #NewmAadhaarApp from: https://t.co/62MEOf8J3P (Android) https://t.co/GkwPFzM9eq (iOS) pic.twitter.com/wVks6zgF31— Aadhaar (@UIDAI) December 4, 2019
आपल्या मोबाइलवर एमआधार अॅप कसे इन्स्टॉल कराल ?
>> गुगल किंवा प्ले स्टोअरवर जा.
>> इन्स्टॉल बटणावर क्लिक करा.
>> त्यानंतर तुम्हाला आवश्यक रिक्वेस्ट द्यावी लागेल.
>> यानंतर तुमच्या फोनमध्ये अॅप इन्स्टॉल होईल.
>> यानंतर तुम्हाला तुमच्या अॅपमध्ये नवीन पासवर्ड सेट करावा लागेल.
>> हा पासवर्ड अॅपच्या प्रत्येक वापरापूर्वी वापरावा लागेल.
>> हा पासवर्ड 4 अंकांचा असेल.
या 13 भाषांमध्ये एक नवीन अॅप असेल
हे नवीन आधार अॅप 13 भाषांना सपोर्ट करते. यात इंग्रजी, हिंदी, बांगला, ओडिया, उर्दू, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, मराठी आणि आसामी भाषांचा समावेश आहे.
नवीन एमआधार अॅपमध्ये दोन प्रमुख विभाग आहेत. या दोन्ही विभागांना आधार सर्व्हिस डॅशबोर्ड आणि माय आधार सेक्शन असे नाव आहे.
1. आधार सर्व्हिस डॅशबोर्ड सर्व प्रकारच्या आधार ऑनलाइन सेवांसाठी असेल. हा आधार फक्त धारकासाठी असेल.
२. My Aadhaar Section: हा एक प्रकारचा आधार प्रोफाइलचा पर्सनललाइज्ड स्पेस असेल. यासाठी युजरला त्यांच्या आधार प्रोफाइलसाठी नोंदणी करावी लागेल.