बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता ओंकार भोजनेला (Onkar Bhojane) ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळाली. हा कार्यक्रम सोडल्यानंतर तो झी मराठीवरील ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात दिसला. नुकताच ओंकारचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. आता पुन्हा एकदा तो मोठ्या पडद्यावर येण्यासाठी तयार झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ‘कलावती’ या चित्रपटात आता ओंकार (Onkar Bhojane) झळकणार आहे. या चित्रपटात तगडी स्टार कास्ट पहायला मिळणार आहे.ओंकार, अमृता खानविलकर हिच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. पहिल्यांदाच तो अमृता बरोबर काम करणार आहे. यावर बोलताना तो म्हणाला, “मी असा कधीच विचार केला नव्हता. कारण मी आजवर ज्यांना बघत वाढलो ज्यांचे चित्रपट पाहण्यासाठी आजवर स्ट्रगल केले त्यांच्या बरोबरच चित्रपटात काम करणार आहे हे खूप वेगळे आहे. मला ते शब्दात मांडता येणार नाही. मी हे सगळं जपून ठेवीन आणि याचा कामावर चांगला परिणाम होईल याकडे नक्कीच लक्ष देईन”. सध्या ओंकारची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
तब्बल 4 वर्षांनी दिग्दर्शक संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.
या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरिष दुधाणे, ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे
आणि नील साळेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचा पहिला पोस्टर देखील आऊट झाला आहे. या पोस्टरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.
संजय जाधव आणि अमृता खानविलकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Onkar Bhojane | marathi actor onkar bhojne talking about expirence working with amurta khanvilkar
हे देखील वाचा :
Pimpri Chinchwad News | जुन्या सांगवीतून 57 वर्षीय व्यक्ती तीन महिन्यापासून बेपत्ता
Khatron Ke Khiladi 13 | ‘खतरों के खिलाडी 13’साठी या स्पर्धकांची नावे झाली फायनल
Ritwik Dhanwat | ऋत्विक धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी निवड