नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील भारत सरकार आता कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत मोठे निर्णय घेण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार ‘वन नेशन, वन पे डे’ लागू करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पगाराबाबत देशात अशीच यंत्रणा कार्यान्वित केली जावी, जेणेकरून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत कर्मचारी आणि कामगारांना एक दिवस (One Nation, One Pay Day) मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यास संबंधीत कायदे आणण्याविषयी बोलले आहेत.
या योजनेविषयी अधिक माहिती देताना केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, सरकार व्यावसायिक सुरक्षा, हेल्थ एंड वर्किंग कंडीशन कोड आणि कोड ऑन वेजेज लागू करण्याच्या दिशेने काम करत आहे.
१) या कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली असून याच्या नियमांवर सध्या काम सुरु आहे.
२) सरकारने ४४ नवीन कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम चालू केले असून यासंबंधी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
३) हेल्थ अॅन्ड वर्किंग कंडीशन कोड हे बिल २३ जुलै २०१९ रोजी संसदेत सादर करण्यात आले होते. या कायद्याला १३ लेबर लॉ मिळून तयार करण्यात आले होते.
४) याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला अपॉइंटमेंट लेटर, वर्षाला मेडिकल उपचार आणि विविध सुविधांची देखील यामध्ये तरतूद करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com