नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेदरलँड्सची राजधानी एम्स्टरडॅममध्ये राहणारा नऊ वर्षीय लॉरेन्ट सिमंसची बुद्धी आइनस्टाईन पेक्षाही फास्ट आहे. लॉरेन्ट पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये ग्रँज्युएशनची डिग्री पूर्ण करणार आहे.लॉरेन्टचा मेंदू इतका वेगात धावतो की त्याने केवळ नऊ महिन्यांतच पदवी पूर्ण केली आहे. लॉरेंट आयन्डहोव्हन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिक अभियांत्रिकी विषयात पदवी घेत आहे. लॉरेंटचा आईक्यू स्तर १४५ इतका आहे, लॉरेंटची बुद्धिमत्ता पाहून जगातील सगळ्यात मोठी युनिव्हरसिटी त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी बोलवत आहे.
परंतु लॉरेंटला अंतराळवीर किंवा हार्ड सर्जन व्हायचे आहे. लॉरेंटने ८ व्या वर्षी असतानाच हायस्कुलची परीक्षा पास केली होती. तसेच लॉरेंटने सांगितले की, पुढील अभ्यासासाठी त्याला कॅलिफोर्नियाला जायचे आहे. परंतु त्याचे आई वडील त्याला युकेमध्ये शिकवू इच्छितात.लॉरेन्टचे वडील अलेक्झांडर सिमन्स हे दंतचिकित्सक आहेत. अलेक्झांडर म्हणतात की यूकेमध्ये ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज सारख्या मोठ्या संस्था आहेत आणि आम्हाला येथे शिकवणे खूप सोयीचे होईल. अलेक्झांडर म्हणाला की लॉरेन्टला कृत्रिम व रोबोटिक्समध्ये पीएचडी करायची आहे. ते म्हणाले की ब्रिटनमध्ये राहून त्याने त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करावे अशी आमची इच्छा आहे.
आजी आजोबांसाठी बनायचे आहे हार्ट सर्जन
बेल्जियममध्ये जन्मलेल्या लॉरेन्ट सिमन्सच्या बुद्धीची तुलना अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंगशी केली जाते. लॉरेन्टला चार भाषांचे ज्ञान आहे. लॉरेन्टची आई लिडिया म्हणाली की त्यांच्या आजी – आजोबांनी क्षमता ओळखली आणि पुढील शिक्षणास मदत केली. लॉरेंट त्याच्या आजी आजोबांवर खूप प्रेम करतो. म्हणूनच लॉरेन्टचे आजी – आजोबा हार्ट पेशंट असल्याने तो हार्ट सर्जन बनू इच्छित आहेत.
Visit : bahujannama.com