गाझियाबाद : वृत्तसंस्था – One Crore | इयत्ता सातवीत शिकणार्या 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर धमकी देणारा आणि एक कोटी रूपयांची (One Crore) मागणी करणारा मेसेज पाठवला. पैसे दिले नाही तर मुलांना मारले जाईल असेही या मेसेजमध्ये म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणी सध्या आई-वडिलांना मुलीचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे आणि अल्पवयीन मुलीविरूद्ध कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गाझियाबादच्या शालीमार गार्डनमध्ये राहणार्या एका इंजिनियरच्या व्हॉट्सअप नंबरवर एक मेसेज आला की, जर एक कोटी रुपये दिले नाही तर मुलगा आणि मुलीची हत्या करू. हा मेसेज वाचून तो व्यक्ती प्रचंड घाबरला आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजले की, इंजिनियरच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज त्यांच्याच लॅपटॉपवरून केला गेला होता. पुढे तपास करताना घरातील 11 वर्षाच्या मुलीसोबत पोलिसांनी चर्चा केली. मुलीने पोलिसांना सांगितले की, हा मेसेज तिनेच वडिलांच्या लॅपटॉपवरून इंटरनेट मेसेजिंगद्वारे केला होता.
मुलीने पोलिसांना सांगितले की, मम्मी-पापा मोबाइल वापरू देत नाही आणि ओरडतात, म्हणून मला
राग आला आणि वडिलांच्या लॅपटॉपचा वापर करून त्यांच्या फोनवर एक कोटी मागणारा मेसेज पाठवला.
जेव्हा आई-वडिलांना त्यांच्या मुलीचा हा उद्योग समजला तेव्हा त्यांनी पुढील कारवाई न करण्याची
विनंती केली. पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात आई-वडिलांना सल्ला दिला की, मुलीसोबत वागण्यात बदल करा आणि तिचे समुपदेशन करा.
Web Title : one crore minor daughter demanded one crore sending message to father by laptop
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
LPG Gas Cylinder Price | 73.5 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर
Weight Loss | कॅलरी इनटेक कमी करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, कमी होईल लठ्ठपणा