पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या (Corona) ओमिक्रॉन (Omicron Covid Variant) या नव्या घात व्हेरिएंटबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील कर्नाटक (Karnataka) आणि गुजरात (Gujarat) या राज्यापाठोपाठ ओमक्रॉनने महाराष्ट्रात (Maharashtra) एन्ट्री केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट (Omicron Covid Variant) सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. याच दरम्यान झांबिया (Zambia) देशातून पुण्यात (Pune) आलेल्या 60 वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तापसणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (National Institute of Virology) प्राप्त झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
झांबिया देशातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय रुग्णामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरिएंट (Omicron Covid Variant) आढळलेला नाही, तर या रुग्णामध्ये ‘डेल्टा सबलिनिएज विषाणू’ (Delta Subliniase Virus) आढळून आला आहे. शनिवारी (दि.4) सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3839 प्रवाशांची आरटीपीसीआर (RTPCR) तपासणी करण्यात आली आहे. तसेच इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांचीही आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.
शासनाचे नागरिकांना आवाहन
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपलं लसीकरण पूर्ण करावं आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबद्दल स्थानिक आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Web Title :- Omicron Covid Variant | a different corona variant was found in the report of a 60 year old man from abroad in pune