बहुजननामा ऑनलाइन टीम – देशभरातील ८.५ लाखांहून अधिक नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२० उद्या १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) घेणार आहे. कोविड-१९ महामारीमुळे जेईई मेन परीक्षा पूर्वीच्या नियोजित वेळेस घेता आली नव्हती आणि दोनदा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र यावेळी महामारीच्या पार्श्वभूमीवर एनटीएने सरकारच्या सूचना व खबरदारीच्या अनुषंगाने परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. या अनुक्रमे एनटीएने परीक्षा केंद्रांना आवश्यक आरोग्य सुरक्षा आणि सावधगिरीच्या सूचनाच दिल्या नाहीत, तर परीक्षेला बसणार्या उमेदवारांसाठीही स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली आहे. परीक्षेदरम्यान अधिक सावधगिरी बाळगणे आणि गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार, एनटीएने जेईई मुख्य परीक्षेसाठी पूर्वी जारी केलेल्या सूचनांमधून अतिरिक्त खबरदारी आणि एसओपीची यादी जारी केली आहे, जी एजन्सीची वेबसाइट आहे आणि जेईई मुख्य परीक्षा पोर्टल jeemain.nta.nic .In वर उपलब्ध केली आहे.
जेईई मेन परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना-
1.आपले प्रवेश पत्र, ओळखपत्र आणि फोटा सोबत घ्या.
2.आपल्याबरोबर पाण्याची पारदर्शक बाटली आणि बॉलपेन घ्या.
3.आपल्याकडे वैयक्तिक हॅन्ड सॅनिटायझर (५० एमएल) ठेवण्यास विसरू नका.
4.परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना तुम्हाला नवीन तीन-प्लाय मास्क देण्यात येईल. घरून आणलेले मास्क घालण्याची परवानगी नसेल.
5.केंद्रावर तुमचे तापमान प्रवेशाच्या वेळी थर्मागेनसह चेक केले जाईल.
6.प्रवेशाच्या वेळीच तुम्हाला प्रवेश पत्रातील बारकोड स्कॅन करून वर्ग (खोली) क्रमांक दिला जाईल.
7.परीक्षा केंद्र आणि हॉलमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.
8.आपली सुरक्षितता तसेच इतर उमेदवारांकडून सामाजिक अंतर राखले जावे.
9.तुमच्या सुरक्षिततेसाठी केंद्राकडून बसण्याची ठिकाण, कम्प्युटर मॉनिटर, कीबोर्ड, माउस, वेबकॅमेरा, डेस्क आणि चेअर स्वच्छ केले जाईल.
10.दोन आसनांमध्ये निश्चित अंतर ठेवले जाईल.
11.उमेदवारांना त्यांच्या डेस्कवरच परीक्षक रफ-शीट देतील आणि हातमोजे घातले असतील. उमेदवार एक्सट्रा-शीट्स मागू शकतात.
12.परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या वेळी आणि ठीक-ठिकाणी हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध असेल.
13.सर्व दरवाजे, पायऱ्यांचे रेलिंग, लिफ्टचे बटणे इत्यादी स्वच्छ केले जाईल.
14.परीक्षा संपल्यानंतर तुम्हाला एकेक करून हॉलमधून बाहेर पडावे लागेल, एकत्र नाही.
15.परीक्षा हॉलमधून बाहेर पडताना तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या वेळी वापरण्यात आलेली रफ शीट ड्रॉप बॉक्समध्ये टाकावी लागेल. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला अपात्र देखील ठरवले जाऊ शकते.