नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या कारवायांमुळे देशभरात एकच धांदल उडाली आहे. एका मागून एक कारवाया सुरु आहेत आयएनएक्स मिडीया प्रकरणी पी. चिदंबरम यांची तर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी केली जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई, प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर देखील चौकशी करण्याचे मागणी ईडीने उच्च न्यायालयात केली आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणी त्यांच्या चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीने उच्च न्यायालयात केलेल्या विनंतीत सांगितले कि, मनी लॉन्ड्रींग च्या अनेक प्रकरणांत रॉबर्ट वाड्रा यांचा संबंध आहे. लंडनमधील १२ ब्रायनस्टन स्वेअर येथील १७ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या प्रकरणी मनी लॉन्ड्रींग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे ताब्यात घेऊन त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, रॉबर्ट वाड्रा हे चौकशीला सहकार्य करीत नसल्याचेही ईडीने सांगितले.
परंतु रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलाने हे आरोप फेटाळून लावले आहे. ते चौकशीला हजर असतात, जेव्हा जेव्हा माझ्या अशिलाला चौकशीसाठी बोलावले आहे, तेव्हा तेव्हा माझ्या अशिलाने संपूर्ण सहकार्य केले आहे. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या अशिलाने दिली आहेत. परंतु आरोप मान्य न करणे म्हणजे चौकशीला सहकार्य करत नाही असे म्हणता येणार नाही. सर्व माहिती जाणून घेऊन दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ५ नोव्हेंबर तारीख दिली आहे.
Visit : bahujannama.com