राजकारणात भूकंप ! हनीट्रॅपमध्ये Ex CM, नेते, अधिकारी, मॉडल, कॉल गर्ल्स आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री, प्रचंड खळबळ

illegal trade
September 26, 2019

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘हनी ट्रॅप’चा खुलासा झाल्यानतंर मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एसआयटीच्या टीमने शेवटचा टप्पा गाठला आहे. हनीट्रॅपच्या या सिंडिकेटमध्ये जवळपास ४० कॉल गर्ल्स असल्याचा नवीन खुलासा झाला आहे. ज्यामध्ये बॉलिवूडच्या काही नायिकांची नावेही समोर येत आहेत. अत्यंत चालाकीने या महिला नेत्याचे आणि अधिकाऱ्यांचे व्हिडीओ काढत होत्या. यांच्यातील बाकीचे लोक या व्हिडीओ आणि फोटोद्वारे ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचे काम करत होते. दरम्यान, याप्रकरणात मध्यप्रदेशच्या एका माजी मुख्यमंत्र्यासह राज्यापाल, राजकीय नेते आणि बडे अधिकारी फसले असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

सुरा, सुंदरी आणि राजकारण
सुंदर महिलांच्या जाळ्यात अनेक नेते सहज अडकतात यायचाच फायदा घेऊन या महिला पुढे ब्लॅकमेलिंग सुरु करून आपल्याला हवे ते काम काढून घेत असत. मध्यप्रदेशात या रॅकेटने मोठा धुमाकूळ घातला होता.या कारनाम्याचे धागेदोरे फक्त मध्यप्रदेश पुरतेच मर्यदित नाहीत. 40 कॉल गर्लचा समावेश असलेले या रॅकेटमध्ये बॉलीवूडमधील अनेक बी ग्रेड अभिनेत्री सुद्धा अडकलेल्या आहेत. त्यामुळे या महिलांकडून अनेक दिग्गज नेत्यांची माहिती आणि खुलासे होऊ शकतात.लवकरच या अभिनेत्रीची नावे सगळ्यांसमोर येणार आहेत.

असे बळी पडत होते नेते आणि अधिकारी
ऑफिस मधून ते बेडरूमपर्यंत जाणाऱ्या या मुली फक्त सुंदरच नाहीतर चतुर सुद्धा आहेत.त्यामुळे यांना नेमकं माहित आहे की समोरच्याला जाळ्यात असे ओढायचे. यांच्याकडे हॉटेमध्ये थांबण्यासाठी नकली आयडी सुद्धा होते. याबाबतचा खुलासा स्वतः पोलिसांनी केलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीत ही बाबा स्पष्ट झाली आहे की असे काम करणाऱ्या मुलींकडे तब्बल तीन तीन आयडी नकली होते. इंदौरचे इंजिनिअर हरभजन सिंह यांच्या तक्रारीनंतर या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. त्याला फसवण्यासाठी हॉटेलमध्ये एक रूम बुक करण्यात आली होती त्या रूममध्ये हरभजन सिंह येण्याआधी एका मुलीने बिना सिम चा आयफोन टेबलवर ठेवला होता. कि जेणेकरून तो चार्जिंगला लावला आहे असे वाटेल. आणि त्यामध्ये व्हिडीओ सुरु ठेऊन तिने सर्वकाही रेकॉर्ड केले होते.

असे समजले रॅकेट चे रहस्य
पोलिसांना असे अनेक व्हिडीओ मिळालेले आहेत. अशा प्रकारे पोलिसांकडून हनी ट्रॅप बाबत तपासणी सुरु आहे. तर आयकर विभाग सुद्धा याकडे करोडोची देवाण घेवाण होत असल्यामुळे लक्ष देऊन आहे. त्यामुळे पकडलेल्या महिलांची सर्व प्रकारची तपासणी सुरु आहे. पोलिसांनी या मुलींकडून जवळजवळ नव्वद असे व्हिडीओ मिळवले आहेत ज्यामध्ये अनेक बड्या लोकांचा समावेश आहे. त्यासोबतच यांच्याकडे सापडलेल्या सिम कार्ड ची तपासणी केली जात आहे. यामध्ये पकडण्यात आलेली एक तरुणी बीजेपीच्या कार्यकाळात बाल कल्याण मंडळाची सदस्य राहिलेली आहे.

आत्ता बरीच मोठी नावे उघडकीस येऊ शकतात
पोलिसांना पुरता विश्वास आहे की यामागे एक मोठे रॅकेट कार्यरत असणार आहे. कदाचित या तरुणी एमपीच्या सुद्धा नसतील कदाचित कामाची गरज असेल तेव्हा त्यांना इंदौर आणि भोपाळमध्ये आणले जात असेल आणि त्या आपले काम करून निघून जात असतील. तसेच पकडलेल्या महिलांकडून जप्त केलेल्या मोबाईल, लॅपटॉपची छाननी करणे सुरु आहे. तसेच या हनीट्रॅपचा उलगडा करण्यासाठी त्यांचे सोशल अकाउंट देखील तपासले जाणार आहे.