उत्तर कोरिया : वृत्तसंस्था – उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची मानवाधिकार असणाऱ्या कार्यकर्त्या येनोमी पार्कला एक धास्ती आहे. कि तिची हत्या होऊ शकेल. परंतु, तरीही येनोमी पार्कने किम जोंग उन यांच्या विरोधातील आपला आवाज आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. येनोमी पार्क हि उत्तर कोरियातील प्रोपोगंडावर सतत आपलं विचार मांडत असते.
पार्क म्हणते की, मी मागील अनेक वर्षांपासून किम जोंग उनच्या टार्गेट लिस्टमध्ये आहे. मला नेहमीच भीती असते की, त्याची साथीदार मला शोधून मारून टाकतील. मला धमक्या मिळत असतात. तर उत्तर कोरियाने मला सार्वजनिकपणे देशाची दुश्मन जाहीर केलं होतं. कारण मी आणि माझी आई देश सोडून पळालो. यामुळे माझ्या परिवाराच्या ३ जनरेशनला तो शिक्षा देत आहे. माझे सर्व नातेवाईक एकतर मारले गेले आहेत किंवा त्यांना तुरूंगात टाकलं आहे.
दरम्यान किम जोंग उनने २०१७ मध्ये त्याचा सावत्र भाऊ किम जोंग नेमची एका एजंटद्वारे हत्या केली होती. ही घटना मलेशियातील एअरपोर्टवर घडली होती. तो नॉर्थ कोरियातील सत्तेवर आपला दावा ठोकू शकत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली आहे. असे तिने सन वेबसाइटसोबत बोलताना म्हटलं आहे.
येनोमी पार्क वर्ष २००७ रोजी मानवी तस्करी करणाऱ्या माणसांना घुस दिली होती. तर या लोकांनी पार्कला अमेरिकेला पोहोचवलं होतं. येनोमी पार्कने हा निर्णय घेतला होता कारण अध्यक्ष किम जोंग उनने तिच्या कॅन्सरग्रस्त वडिलांना भीतीदायक कंस्ट्रेशन कॅम्पमध्ये बंद केलं होतं. या दरम्यान, येनोमी पार्क म्हणते की पार्क म्हणाली की, जमाल खरगोशीसाऱख्या ज्येष्ठ पत्रकाराला तुर्कीसारख्या देशात मारण्यात आलं होतं. यावरून हे स्पष्ट होतं की, हुकूमशहा दुसऱ्या देशातही हत्या घडवून आणू शकतो. त्यामुळे मलाही सतत भीती असते.
दरम्यान, येनोमी ही सध्या शिकागोमध्ये राहावयास आहे. तसेच येनोमी पार्क ही नेहमी किम जोंग उनचे सत्य लोकांसमोर उघड करीत असते. पार्कने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद करत म्हटलं आहे, की, उत्तर कोरियाचे अध्यक्ष आपल्यासोबत २ हजार सेक्स स्लेव ठेवतो. पार्कला सतत याची भीती असते की, अमेरिकेत असूनही किम जोंग उन तिची हत्या करू शकतो. तिने असा दावा केला होता की कोरोना काळात किम जोंग उन हजार सेक्स स्लेवसोबत होता आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या वॉन्सन कंपाउंडमध्ये विलगीकरणात होता. या महिलांना प्लेजर स्क्वॉड म्हटलं जातं आणि या महिला उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उनसोबत मनोरंजनासाठी असतात.