बहुजननामा ऑनलाईन – Nora Fatehi | सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीची. यामध्ये अनेक भारतीय बॉलीवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. तर भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे या विश्वचषकात भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल आणि डान्सर नोरा फतेहीने (Nora Fatehi) परफॉर्मन्स केले होते. तिच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी नोराने ‘लाइट द स्काय’ हे गाणे सादर केले आहे. तिच्यासोबत बल्कीस, रहमा रियाद आणि मनाल हे देखील उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर नोराच्या (Nora Fatehi) या व्हिडिओवर सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की नोराने डान्स सोबत गाणे देखील गायले आहे. मध्ये मध्ये ती हिंदीमध्ये देखील आवाज काढल्याने चाहते तिचा अभिमान व्यक्त करत आहेत.
या ऐतिहासिक सामन्यासाठी नोराने काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेससोबत ब्लॅक स्टॉकिंग्ज घातले होते.
या ऐतिहासिक सामन्यासाठी नोरासह बॉलीवूडमधील दीपिका पादुकोण, मोनी रॉय, मानुषी छिल्लर, शाहरुख खान
हे कलाकार देखील दिसले होते. सध्या सर्वत्र नोराच्या डान्सचे कौतुक होताना दिसत आहे.
फिफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करणाऱ्या बॉलीवूडच्या नोरा फतेहीने फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो
यांना स्नीकर्सची एक जोडी भेट दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Nora Fatehi | fifa world cup 2022 and nora fatehis dace performance video viral
हे देखील वाचा :
Deepika Padukone | बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकनीची किंमत ऐकून व्हाल थक्क