बहुजननामा ऑनलाईन टीम – केंद्रीय परिवाहमंत्री नितीन गडकरींनी खराब रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारला जाणार आहे याबाबतचे ट्विट करत माहिती दिली. ट्विटमध्ये सांगताना नितीन गडकरींनी म्हणाले की, नवीन मोटार वाहन कायद्याअंतर्गत फक्त वाहनचालकांनाच नाही तर आता खराब रस्त्यांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांनवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
आतापासून जर रास्ता बनवणाऱ्या कंत्राटदाराने जर रस्ता खराब बनवला किंवा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये खराब सामग्रीचा वापर केला तर आता अशा ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे. याअंतर्गत आता एक लाखांपर्यंतचे दंड ठेकेदारांना होऊ शकतो. याआधीही त्यांनी अनेक ट्विट शेअर करत रस्त्यांच्या नियमांबाबत खूप चिंता व्यक्त केली. या आधीही त्यांनी फॉल्टी वाहन निर्मिती करणाऱ्यांबाबत सुद्धा ट्विट केले होते. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की वाहन निर्मात्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई होणार आहे.
याआधीही एका मीडिया चॅनलवर नितीन गडकरी यांनी ताशेरे ओढले होते. एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर करत गडकरी यांनी मला माफ करा कारण आज पुन्हा आमच्या एक मीडिया मित्राने रस्ता सुरक्षेच्या बाबतीतील गोष्टींची थट्टा केली असल्याचे म्हंटले होते. याआधीही नव्या मोटार वाहन कायद्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर नितीन गडकरी यांनी फटकारले होते. यावेळी ते म्हणाले होते की, लोकांशी निगडित असलेल्या अशा गंभीर गोष्टींबाबत लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवू नका.
Visit : bahujannama.com