बहुजननामा ऑनलाईन
नीरा येथील कोरोणा रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुरंदर -दौंडचे प्रांताधिका-यांनी नीरा गांव १४ दिवसांकरिता कंटेन्मेंट झोन ( प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर केला असल्याने येत्या २४ सप्टेंबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता नीरा गांव बंद राहणार असल्याची माहिती नीरा ग्रामपंंचायतीचे ग्रामसेवक मनोज डेरे यांनी दिली.
नीरा ( ता.पुरंदर ) येथील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येेमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभुमीवर नीरा येथील व्यापारी व ग्रामस्थांनी दि.११ सप्टेंबर पासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळला. या दरम्यान कोरोना रूग्णांंची संख्या वाढू नये याकरिता पुरंदर- दौंडचे प्रांताधिका-यांनी नीरा गांव २४ सप्टेंबर पर्यंत १४ दिवसांकरिता कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र ) म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे शुक्रवार (दि.१८) पासून नीरा येथील किराणा दुकाने, फळे, भाजीपाला, दूध, शेती औषधे, पशुखाद्य या अत्यावश्यक सेवा सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच दवाखाने, औषध दुकानेे, टेस्टिंग लँब या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. व इतर अस्थापणे दि.२४ सप्टेंबर पर्यंत बंद राहतील असे ग्रामसेवक मनोज डेरे यांनी सांगितले.
दरम्यान, नीरा येथे येत्या सात दिवसांत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली तर २४ सप्टेंबर नंतर आणखी पुढे कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच नीरा येथील नागरिकांनी विनाकारणाने बाहेर न फिरता घरातच राहून कोरोनाच्या आजारापासून दूर रहावे व कंटेन्मेंट झोनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन ग्रामसेवक मनोज डेरे यांनी केले आहे.