श्रीनगर : वृत्तसंस्था – NIA| आयएसआयएस मॉड्यूल आणि टेरर फंडिंगच्या प्रकरणात रॉ (RAW) आणि आयबीच्या (IB) साथीने एनआयएने (NIA) जम्मू काश्मीरमध्ये १० ठिकाणी छापे घातले असून अनेकांची चौकशी सुरु केली आहे. टेरर मासिकाबाबत हे छापे घातले असून या मासिकाचे आतापर्यंत १७ अंक प्रकाशित झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या मासिकामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव बाबतचे लेख छापले जातात. हे मासिक अफगाणिस्तानमधून प्रकाशित केले जात असल्याचे मानले जात होते. आयएसशी (IS) संबंधित जम्मू काश्मीर/ दिल्लीची टीम हे मासिक प्रकाशित करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधातूनच तपास एजन्सींनी काश्मीरमध्ये १० ठिकाणी छापे घातले आहेत.
एनआयएने आज सकाळी दारुल उलूम, दलाल मोहल्ला, नवाबाजार या भागात पोलीस, एसओजी,
एसडीपीओ यांचे अनेक अधिकार्यांसमवेत हे छापे घातले. तपासणीत काही ऑफिस रेकॉर्ड, एक
लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर अदनान अहमद नदवी (Adnan Ahmed Nadvi) याला अटक करण्यात आली आहे. नदवी हा हाकाबाजार येथे राहणारा आहे. काश्मीरमधील दारुल उलूम ही उत्तर प्रदेशातील लखनौ येथील दारूल उलूमशी संबंधित आहे.
Web Title : nia raids at 10 places in jammu and kashmir with raw ib
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जळगाव जिल्ह्यातील जवान लेह लडाखमध्ये शहीद
बैलगाडीवरुन पडल्यानंतर भाजप नेत्यांच्या टिकेला भाई जगतापांनी दिले खरमरीत ‘प्रत्युत्तर’
कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत