नवी दिल्ली : वृत्तसंस्था – India Coronavirus Cases | देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेचे संकट अजूनही कायम आहे. रोज 40 हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाने संक्रमित होत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात 41,506 नवीन कोरोना केस (India Coronavirus Cases) आल्या आणि 895 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी 42,766 नवीन केस आल्या होत्या. तर मागील 24 तासात 41,526 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. म्हणजे काल 915 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोरोना संसर्गाची एकुण प्रकरणे
हा लागोपाठ 33वा दिवस आहे जेव्हा भारतात एक लाखापेक्षा कमी नवीन कोरोना व्हायरस प्रकारणे समोर आली. कोरोना अॅक्टिव्ह केस आता 5 लाखाच्या खाली आल्या आहेत. सध्या 4 लाख 54 हजार 118 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत आणि आतापर्यंत एकुण 4 लाख 8 हजार 40 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकुण 2 कोटी 99 लाख 75 हजार लोक बरे झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकुण 3 कोटी 8 लाख 37 हजार 222 लोक संक्रमित झाले आहेत.
37 कोटीपेक्षा जास्त व्हॅक्सीन डोस दिले
आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, 10 जुलैपर्यंत देशभरात 37 कोटी 60 लाख कोरोना व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत. काल 37 लाख 23 हजार 367 डोस दिले गेले.
मृत्यूदर 1.32 टक्के
देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.32 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 97 टक्केपेक्षा जास्त आहे. अॅक्टिव्ह केस दिड टक्केपेक्षा कमी आहे. कोरोना अॅक्टिव्ह केस प्रकरणात जगात भारत चौथ्या स्थानावर आहे. एकुण संक्रमितांच्या संख्येत सुद्धा भारत दुसर्या स्थानावर आहे. तर जगात अमेरिका, ब्राझील नंतर सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत.
राज्य आणि कारोना स्थिती
* उत्तर प्रदेश
मृत्यू 4, नवीन प्रकरणे 100
* महाराष्ट्र
नवीन प्रकरणे 8,296, मृत्यू 179
* तमिळनाडु
नवीन प्रकरणे 2,913, मृत्यू 49
* कर्नाटक
नवीन प्रकरणे 2,162, मृत्यू 48
* मध्य प्रदेश
नवीन प्रकरणे 27
* राजस्थान
नवीन प्रकरणे 56, मृत्यू 2
Web Title : india coronavirus cases today 11 july 2021 covid news update cases deaths second wave
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जळगाव जिल्ह्यातील जवान लेह लडाखमध्ये शहीद
बैलगाडीवरुन पडल्यानंतर भाजप नेत्यांच्या टिकेला भाई जगतापांनी दिले खरमरीत ‘प्रत्युत्तर’
कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत