पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पोलीस दल 24 तास काम करत असताना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्फेक्ट पेस्ट कंट्रोल व क्रिएटिव्ह फौउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी पोलिस आयुक्त कार्यालयाचे आणि चार पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान पोलीस 24 तास काम करत आहेत. त्यावेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यात काही पोलीस ठाण्यात नागरिक ये-जा करतात. त्यामुळे त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
नागरिकांचा वावर असलेल्या ठिकाणाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पर्फेक्ट पेस्ट कंट्रोलचे संचालक गोपी नायर व क्रिएटीव्ह फौउंडेशनचे प्रयत्नशील होते. त्यांनी प्रमाणित असलेल्या औषधाचा वापर करून प्रभावी जंतूनाशक तयार केले. आज पोलिस आयुक्तालयाचे निर्जंतुकीकरण केले. तसेच बंडगार्डन, कोरेगांव पार्क पोलिस ठाण्याचे निर्जंतुकीकरण केले.
अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे ,पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलिस आयुक्त आस्थापना मिलिंद पाटील यांच्या सहकार्याने हे काम पार पडले. आणखी काही पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.