नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने नवीन सिलेंडर ( New LPG Composite Cylinder ) बाजारात आणला आहे. या सिलेंडरमध्ये आता सहज समजू शकते की किती गॅस शिल्लक आहे. या सुरक्षित स्मार्ट सिलेंडरबाबत आणखी महत्वाच्या गोष्टी जाणून घेवूयात…
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कंपोझिट सिलेंडरचे फायदे
1 – हा अधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला सिलेंडर आहे.
2 – सध्याच्या सिलेंडरच्या तुलनेत याचे वजन निम्मे आहे.
3 – गंजरोधक असल्याने फरशीवर डाग पडणार नाहीत.
4 – याचे डिझाईन यास आणखी आकर्षक बनवते.
काय आहे किंमत
सध्या हा स्मार्ट गॅस सिलेंडर दिल्ली, गुरूग्राम, हैद्राबाद, फरीदाबाद आणि लुधियानात मिळत आहे. लवकरच देशभरात उपलब्ध होईल. तो 5 किलोग्रॅम आणि 10 किलोग्रॅमच्या साईज मिळत आहे. सध्या 10 किलोग्रॅम गॅस सिलेंडरसाठी 3350 रुपये आणि 5 किलो गॅस सिलिंडरसाठी 2150 रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, सध्या घरगुती सिलेंडरच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
Web Titel :- new lpg gas cylinder lpg composite cylinder lpg gas cylinder your gas cylinder is smart will know in advance the date of refill check more details along with price
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण