NCP MLA Jitendra Awhad | ‘माझ्यावर हल्ला केल्यास मला…’ चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनामध्ये महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि औरंगजेब (Aurangzeb) यांच्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांना आयते कोलीत मिळाले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक व्हिडिओ क्लिप आणि एक फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता पुन्हा आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी ट्विट करत बावनकुळेंना प्रतिआव्हान दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
माझ्यावर हल्ला केल्यास मला…
जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी ट्विट करत म्हटले की, मी कधीच कुणावर वैयक्तिक कंबरे खाली वार करत नाही कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही पण माझ्यावर हल्ला केल्यास मला प्रतिउत्तर द्यावे लागेल, तेव्हा एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करु नका, असे त्यांनी म्हटले आहे.
मी कधीच कुणावर वैयक्तिक कंबरे खाली वार करत नाही कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही पण माझ्यावर हल्ला केल्यास मला प्रतिउत्तर द्यावे लागेल
तेव्हा एकमेकान वर वैयक्तिक हल्ला करू नका— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2023
काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांची एक पत्रकार परिषद झाली. मराठीत पत्रकार परिषद सुरू असताना हिंदीत एक प्रश्न आला. त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केला होता. त्याचा व्हिडिओ ट्विट करत आव्हाड यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना मी जितेंद्र आव्हाड यांच्या मनातच औरंगजेबजी आहेत, असा टोला लगावल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
वाह बावनकुळेजी … “औरंगजेबजी”
दुसरे कुणी बोलले असते तर पाकिस्तान चे तिकीट दिले असते pic.twitter.com/Y3V7TOhZRC— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2023
जितेंद्र आव्हाड यांच्या मनात औरंगेजेबाविषयी ‘जी’ आहे. औरंगेजेबाचा सन्मान होऊ शकत नाही तो क्रुरकर्माच आहे. pic.twitter.com/SdlPrI074Y
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 5, 2023
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
औरंगजेबजीच्या कबरीवर…
जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडिओ ट्विट केला तसेच फोटो ही ट्विट केला. फोटोमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President JP Nadda) आणि बावनकुळे हे एका दर्ग्यात फुले वाहताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी या फोटोला कॅप्शन दिले की, ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’. यावर बावनकुळे यांनी ‘इतका निचपणा’ कसा काय करता, असा प्रश्न उपस्थित केला. याच ट्विटला आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रपूर येथे पवित्र दर्ग्यात आम्ही भावभक्तीने दर्शन घेतले, आणि आव्हाड म्हणतात औरंगेजेबाच्या थडगेचे दर्शन घेतले, इतका नीचपणा pic.twitter.com/xnfhYpeGpH
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 5, 2023
आम्ही धर्माच्या विरोधात असतो तर…
पवित्र दर्ग्याचे दर्शन घेतानाची तुलना तुम्ही औरंगजेबाच्या कबरीशी (Aurangzeb’s Tomb) केली आहे.
आम्ही धर्माच्या विरुद्ध असतो, तर अटल बिहारी वाजपेयींच्या (Atal Bihari Vajpayee) काळात
अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती (President Abdul Kalam) केलं नसतं. धर्म पवित्रच असतो.
आमचा विरोध दहशतवादी विचारसरणीला आहे. तुम्ही मुस्लीम समाजाचा, त्यांच्या भावनांचा अनादर केला आहे,
असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | ncp mla jitendra awhad revert back to chandrashekhar bawankule on his comment
हे देखील वाचा :
Raj Thackeray | ‘…तर जैन धर्माला नको असलेल्या गोष्टी तेथे घडतील’, राज ठाकरेंची झारखंड सरकारला विनंती
Pune Crime | पुणे : पत्नीचा खून करणार्या पतीला जन्मठेप
Chhagan Bhujbal | शरद पवारांना जाणता राजा म्हणणारच, छगन भुजबळांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या ‘राजकारणात सक्रिय महिलांबाबत…’
Comments are closed.