बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जबाबदार पदाधिकारी असलेल्या स्नेहल कांबळे यांनी फेसबुकवरून बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक तथा अपमानजनक मजकूर शेअर केला आहे. त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांनी केली आहे.
वंचित बहुजन तालुका तिवसाच्या वतीनं स्नेहल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदेखील देण्यात आली आहे. तक्रार देताना बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांच्यासह सतीश यावले, तालुका अध्यक्ष सुमित सोनोने, शहर अध्यक्ष संदीप मकेश्वर, प्रवीण निकाळजे, राहुल गोपाळे, बबलू मुंद्रे, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, धनंजय आसोडे, भाष्कर आसोडे, सम्यक हगवने, रोशन खडे आदी उपस्थित होते.
तक्रारीमधून अटक करण्याची मागणी
स्नेहल कांबळे या ओबीसी महासभेच्या अध्यक्षा आहेत. त्या कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहेत. कांबळे यांनी 25 डिसेंबर रोजी फेसबुकवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट केला आहे. राष्ट्रीय सेवा संघाचे दलाल अशा शब्दात त्यांनी टीका केली. त्यामुळं अमरावती जिल्ह्यातील तिवसा वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत स्नेहल कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.